नगर –
जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज मंगळवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यामध्ये पोलीस निरीक्षक ज्योती चंद्रकांत गडकरी, चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सुखदेव शिंदे, अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार काशिनाथ तुकाराम खराडे, रविंद्र रघुनाथ कुलकर्णी, राजेंद्र सर्जेराव सुपेकर, चालक अर्जुन दशरथ बडे, पोलीस हवालदार शैलेश चंद्रकांत उपासनी, मन्सूर सय्यद, कैलास भास्कराव सोनार, अजित अशोक पटारे, आदींचा सन्मानपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदिसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.