कुमार जयसिंगराव ढमढेरे जि.प शाळेत मिळणार अवकाश दर्शन

0

सावित्रीबाई फुले ग्रंथालय व आद्यक्रांतिकरक विष्णू गणेश पिंगळे अवकाश निरीक्षण केंद्राचे उदघाटन

ढमढेरे । प्रतिनिधी:
 

लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या मार्फत कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळेमध्ये अवकाश निरीक्षण केंद्र आणि ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत अवकाश दर्शन होणार आहे.           

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुधीर बाळसराफ यांच्या संयोगाने लायन्स क्लब सहकारनगर पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच या शाळेमध्ये अवकाश निरीक्षण केंद्र नुकतेच करण्यात आले.

या अवकाश संशोधन केंद्रामध्ये शालेय स्तरावरील प्राथमिक स्वरूपाचे अवकाश निरीक्षण व संशोधन करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य ३ टेलिस्कोप, दुर्बीण सूर्य या अवकाश निरीक्षणासाठी लागणारे फिल्टर्स व इतर साहित्य या अवकाश निरीक्षण केंद्रामध्ये आहे. यातून विद्यार्थी अवकाश निरीक्षण व प्राथमिक स्वरूपाचे संशोधन करू शकतात व आंतरराष्ट्रीय स्तरावरती नोंदवू शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी यातून वैज्ञानिक घडण्यासाठीची पायाभरणी होईल. याचा विद्यार्थी, शिक्षक व आसपासच्या शाळांनाही उपयोग होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर लायन्स क्लबच्या माध्यमातून सुविधा निर्माण करून देणार आहे.

सेवाभावी जागतिक पातळीवर काम करणारी संस्था आहे. इयत्ता पहिली पासून सातवीच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे.या अवकाश निरीक्षण केंद्राचे नाव आद्यक्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे असे देण्यात आले. तसेच  ग्रंथालयांमध्ये ७५० पुस्तके देऊन भव्य स्वरूपाचे ग्रंथालय प्रदान करून या ग्रंथालयाचे नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे देण्यात आले.    

यावेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री, माजी प्रांतपाल सी.डी सेठ, सचिव राहुल शहा, कोशाध्यक्षा जयश्री दिवाकर, डॉ. प्रसाद खंडागळे, खगोलशास्त्रज्ञ डॉ विशाल कुंभारे, प्रकाश नारके, सरिता सोनवणे, बाळासाहेब नरके, आरतीताई भुजबळ, अनिल भुजबळ, अँड सुरेश भुजबळ, महेश भुजबळ, डॉ.चंद्रकांत केदारी,मच्छिंद्र भुजबळ, नवनाथ ढमढेरे,संदीप ढमढेरे, राजेंद्र केदारी, बाळासाहेब लांडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here