चोरीच्या बहाण्याने बबनराव कवाद यांच्या घरावर हल्ला

पारनेर : शुक्रवार रात्री १२ : ३० च्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते बबनराव कवाद यांच्या निघोज येथील राहत्या घरावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करत,प्रथम सीसी टीव्ही कॅमेरे फोडले व नंतर घराची खिडकी फोडून आत जाण्याचा प्रयत्न केला.खिडकी तोडण्याचा आवाज झाल्यावर बाळासाहेब कवाद यांना जाग आली.आवाजामुळे कवाद यांचा मुलगा व मुलगी जागे झाले व त्यांनी आपले शेजारील लोकांना फोन केल्यामुळे काही अघटीत घडले नाही.त्यानंतर बबनराव यांनी पोलिसांना फोन करून घटनेबाबतची माहिती दिली.
पोलिसांसह शेजारील नागरीक तातडीने कवाद यांच्या मदतीला धावुन आले असता,चोरांनी तेथुन पळ काढला.चोर त्यांच्या चपला व इतर साहित्य जागेवरच टाकून अंधाराचा फायदा घेवून पळुन गेले.निघोज पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट देवून या चोरांचा शोध घेण्याचे आश्वासन दिले.
मात्र घरी आलेले चोरटे हे चोरटे नसुन,चोरीच्या नावाखाली काही समाजकंटकच माझे घरी आले असुन,ते समाजकंटकच असावेत असेे कवाद यांनी सांगीतले.सामाजिक कामेे,अन्यायाा विरोधामधे मी आहे.यामुळे समाजकंठक दहशत निर्माण करत असावेत असा संशय कवाद यांना आहे.यापुर्वीही असे
अनेकदा असे प्रकार घडले आहेत.भ्रष्टाचार व अवैध धंदे यांच्या विरोधात मी नियमीत आवाज उठवत असल्या कारणाने दुखावलेले समाजकंटक त्यासाठी असा मार्ग निवडत असल्याचे बबनराव म्हणाले.मी निघोजमध्ये राहत नसुन, माझ्या कुटुंबीयांच्या जिविताला धोका पोहचु शकतो.कुटुंबियांच्या जिवीताला धोका पोहचु नये यासाठी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणीही कवाद यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here