जामखेड तालुका पुन्हा गोळीबाराने हादरला

पिस्टल हातळताना मित्रालाच फायर.आरोपीला अटक
राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

जामखेड : जामखेड तालुक्यातील जवळका येथे
दि .१४ रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास अब्दुल कमाल शेख वय ३० वर्षे रा.जवळके ता.जामखेड हा त्याच्याकडील विनापरवान्याचे गावठी बनावटीचे पिस्टल हाताळतांना त्याच्या पिस्टल मधुन फायर होवुन बारीकराव शहाजी जावळे हे जखमी होऊन त्यांच्या हाताला गोळी लागल्याने त्यास उपचारार्थ नगर येथे दाखल करण्यात आले आहे. आरोपी अब्दुल कमाल शेख यांच्या कडून २५ हजार ४०० रुपये किमतीचा पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आला .

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीवरून , जवळके गावचे शिवारात सटवाई मंदिराचे पुर्व बाजूला मोकळया जागेत त्यांचे मित्र बसले होते. आरोपी अब्दुल कमाल शेख यांनी पिस्टल हाताळताना फायर होऊन बारीकराव शहाजी जावळे यांच्या हाताला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत ते अहमदनगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेबाबत स्थानीक गुन्हे शाखेचे सपोनि शिशिरकुमार देशमुख व त्यांचे सोबत पो.ना.विशाल दळवी , पो.कॉ. सागर ससाणे , पो.कॉ रोहीत येमुल चा.पो.ह. उमाकांत गावडे असे लगेच शहरामधील मॅक्स केअर हॉस्पीटल ला जाऊन आरोपी अब्दुल कमाल शेख हा मिळाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.झालेल्या घटनेचे माहिती आरोपीने गावठी कट्टाने फायर करुन त्यामधे इसम नामे बारीकराव शहाजी जावळे रा.जवळके हा जखमी झाल्याबाबत कबुली दिली व त्याच्या जवळ असलेला गावठी कट्टा ताब्यात घेण्यात आला आहे.

तसेच आरोपीकडे २५,४०० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . यात सदर आरोपी अब्दुल कमाल शेख वय ३० वर्षे रा.जवळके ता.जामखेड यास २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसा सह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन , जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहेत. जेरबंद करण्याची कारवाई सपोनि शिशिरकुमार देशमुख व त्यांचे पथकामधील कर्मचारी पो ना विशाल दळवी , पो.कॉ. सागर ससाणे , पो.कॉ . रोहीत येमुल चा.पो.ह. उमाकांत गावडे सर्व नेम . स्थागुशा अ.नगर यांनी केलेली आहे .

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here