नितीशकुमार आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

पाटणा : बिहार निवडणुकीनंतर एनडीएचे नेते म्हणून आज नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्यासमोर सत्तास्थापनेचा दावा सादर केला. यादरम्यान, १२६ आमदारांच्या समर्थनाचं पत्र त्यांनी राज्यपालांकडे सोपवलं. त्यांच्यासोबत बिहार भाजप अध्यक्ष संजय जयस्वाल, माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे अध्यक्ष जीतनराम मांझी, व्हीआयपी पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहनी हेदेखील उपस्थित होते. परंतु, यादरम्यान उपमुख्यमंत्रीपदावरचा सस्पेन्स मात्र नितीश कुमार यांनी कायम ठेवलाय.

याच दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुशीलकुमार मोदी  हेदेखील राजभवनावर पोहचले.   ‘एनडीएच्या बैठकीत नेता म्हणून माझी निवड करण्यात आली. त्यानंतर आम्ही राज्यपालांसमोर सत्तास्थापनेचा दावा केलाय. उद्या सायंकाळी ४.०० वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे’ अशी माहिती नितीश यांनी दिली. बिहारचे याअगोदरचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, प्रेमकुमार, कामेश्वर चौपाल, भाजपाचे तारकिशोर प्रसाद सिंह व रेणुदेवी यांची नावं उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत.  

भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा होती : नितीशकुमार

 भाजपच्या एखाद्या नेत्याने यावेळी मुख्यमंत्री व्हावं, अशी माझी इच्छा होती परंतु, लोकांनी मलाच मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह केला. म्हणून आपण खुर्ची स्वीकारली. 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here