Breaking News: गोळीबाराने केडगाव पुन्हा हादरले... एक ठार

 

राष्ट्र सह्याद्री



नगर : अहमदनगर  येथील केडगाव उपनगर परिसरातील बाह्यवळण रस्त्यावर गुरुवारी दि.२३ फेब्रुवारी रोजी रात्री गोळीबार झाला. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

केडगाव बाह्यवळण रस्ता परिसरात काल रात्री साडेदहा वाजता एका हॉटेलमध्ये बसलेल्या दोन जणांवर तीन अज्ञात व्यक्तींनी लूट करण्यासाठी गोळीबार केला यात शिवाजी किसन होले (रा.कल्याण रस्ता,अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला .तर अरुण नाथा शिंदे (रा.नेप्ती, ता. नगर) हे गंभीर जखमी झाले.

यातील जखमी शिंदे यांच्याकडील सात हजार रुपये हल्लेखोरांनी नेले. ही माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे घटनास्थळी दाखल झाले. या पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके पाठविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या