आदर्श पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक ; इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हजारो संख्येने ठेवीदार रस्त्यावर

 


आदर्श पतसंस्थेची प्रॉपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संभाजीनगर 

आदर्श पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या ठेवी अडकल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. डीडीआर ऑफिससमोर थाळी नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या ठेवीदारांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचंही पाहायला मिळालं. याच प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी आदर्श पतसंस्थेमधील घोटाळ्याबाबत भाष्य केलं. आदर्श पतसंस्थेची सर्व प्रॉपर्टी ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे देण्यात येतील, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. कोणाचेही पैसे बुडणार नाहीत, असं ते म्हणाले.

खासदार जलील माझ्याशी भेटले होते. आदर्श पतसंस्था प्रकरणी जो भ्रष्टाचार झाला आहे. लोकांची फसवणूक झाली आहे. यामध्ये आदर्श पतसंस्थेच्या सर्व प्रॉपर्टी ताब्यात घेऊ आणि लोकांचे सगळे पैसे परत करु, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे पैसे परत मिळतील अशी अपेक्षा ठेवीदारांमध्ये निर्माण झाली आहे.

मंत्रिमंडळ भेटीतील वेगवेगळे निर्णय वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा

आज मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे आदर्श पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक झाले. हजारोंच्या संख्येने ठेवीदार आंदोलन करत होते. मंत्र्यांनी येऊन ठेवीदारांना भेटावे, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.


मंत्री फक्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसण्यासाठी येथे आले आहेत का? इथे अनेक गरिब लोकांचा पैसे अडकले आहेत. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी येथे येऊन ठेवीदारांशी चर्चा करावी असं ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या