साईमंदिर दर्शनासाठी खुले

  • नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी भोसले यांचे आवाहन 
  • शिर्डी: येथील साई मंदिर आजपासून सर्व भाविकांसाठी खुलं होणार आहे. शिर्डीमधील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी फक्त राज्य नाही तर देश-परदेशातून भाविक येत असतात. दरम्यान शिर्डी साई संस्थानकडून दर्शनासाठी नियमावली जाहीर करण्यात आली. शिर्डीला कुटुंब किंवा मित्रांसोबत दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधीकारी राजेंद्र भोसले आणि साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले आहे. 
  • त्यानुसार, पहाटेच्या काकड आरतीपासून भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन पास घ्यावा लागणार आहे. ठरवून देण्यात आलेली वेळ आणि तारखेनुसार भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे. ३००० भाविकांना ऑनलाइन पेड पास दिला जाणार आहे. एरव्ही आरतीसाठी २५० ते ३०० भाविक उपस्थित असत. मात्र यावेळी आरतीसाठी ५० जणांनाच सहभागी होता जाणार आहे. आरतीसाठी पास आरक्षित असणार आहे.
  • हार, फुलं, प्रसाद मंदिरात नेता येणार नाही. समाधीला हात न लावता दर्शन घ्यावे लागेल. .मोबाइल आणि इतर वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • आरतीनंतर गावकऱ्यांना दर्शनासाठी विशेष प्रवेश दिला जाणार. मतदार ओळखपत्र दाखवल्यानंरच प्रवेश दिला जाईल. ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींना प्रवेश दिला जाणार नाही. राज्य सरकारनेच तसा आदेश दिला आहे.
  • साई निवास व्यवस्थेसाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे. मास्क बंधनकारक असणार आहे. थर्मल स्क्रिनिंग आणि नियम पाळणं बंधनकारक आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here