गोमांस घेऊन जाणाऱ्या चार जनांवर पोलिसांची कारवाई

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातून अवैधरित्या वाहतूक करीत गोमांसाची तस्करी करणाऱ्या दौंड येथील तीन व खडकत, आष्टी येथील एक अशा चौघांवर श्रीगोंदा पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये आज कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास एका खाजगी कारच्या साह्याने श्रीगोंदा शहरातून काष्टी रोड, पेडगाव चौकामध्ये पोलिसांनी लावलेल्या चेकपोस्ट दरम्यान येथून वाहतूक करून जाणाऱ्या या कार ला थांबवून चौकशी व तपासणी केली असता, त्यामध्ये गोमांस (बैल व गाई)चे मांस आढळून आले. यानंतर श्रीगोंदा पोलीसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल योगेश शंकर भापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अभिजीत रमेश जाधव राहणार दौंड, साहिल इलियाज कुरेशी राहणार दौंड, मुस्तकीन हुसेन कुरेशी राहणार दौंड व इफ्तकार कुरेशी राहणार खडकत, आष्टी,बीड यांस साडे तीनशे किलो गोमांस व कार सह ताब्यात घेण्यात आले आहे.

यानंतर त्यांच्यावर भादवि कलम ४२९,१८८,३४ व महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा १९७६ चे कलम ५ (क) व ९ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोलिस हेड कॉन्स्टेबल बडे यांनी दाखल केला असून, हेड कॉन्स्टेबल झुंजार हे पुढील तपास करीत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here