सिद्धिविनायक मंदिर उघडले… पण कोरोना नियमावलीचा फज्जा

भाविकांची गर्दी; कोरोनाबाबत उशीरा उपाययोजना

सचिन गुरव । राष्ट्र सह्याद्री

सिद्धटेकः
जगप्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र सिद्धटेक येथील श्री सिध्दीविनायक मंदिर आठ महिन्यानंतर पाडव्यादिवशी पहाटे दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यामुळे दीपावली पाडव्याची पर्वणी साधत भाविकांनी मोठ्या उत्साहात श्री सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. दरम्यान, दुपारनंतर गर्दी वाढल्याने कोरोनाबाबत दक्षता म्हणून उपाययोजना करण्यात आल्या.


          कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यात बंद करण्यात आलेले येथील सिद्धीविनायक मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. नित्यक्रमातील षोडशोपचार पूजेनंतर भाविकांनी रांगेमध्ये श्रीगणेशाचे दर्शन घेतले. दरम्यान,  अनेक दिवसांपासून बंद असलेले व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू झाले होते.

श्री सिद्धीविनायकाचे मंदिर दर्शनासाठी उघडल्यानंतर ‘कर्जत- जामखेड’चे आमदार रोहित पवार दर्शनासाठी आले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने भाविक तसेच स्थानिकांची गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचे कुणालाही भान राहिले नव्हते. त्याबरोबरच अनेकांनी मास्कही घातलेले नव्हते. आमदारांच्या अचानक येण्यामुळे मंदिर व्यवस्थापनही कोरोनाबाबत खबरदारी न घेता केवळ बघ्याच्या भूमिकेत होते.

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here