२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन
पुस्तकांसाठी 'राजगृह' उभारणारा जगातील एकमेव महापुरुष!
मुंबई: "वाचाल तर वाचाल" हा मंत्र देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचनप्रेम अवघ्या जगाला परिचित आहे. आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त त्यांच्या ग्रंथप्रेमाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
- पुस्तकांसाठी स्वतंत्र घर: माणसे राहण्यासाठी घर बांधतात, परंतु डॉ. बाबासाहेबांनी आपल्या ५०,००० हून अधिक पुस्तकांसाठी मुंबईत 'राजगृह' नावाचे तीन मजली निवासस्थान बांधले. हे त्या काळातील जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते.
- : त्यांच्या संग्रहात राजकारण, कायदा, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्रावरील हजारो दुर्मिळ ग्रंथ होते.
- विद्यापीठात दुर्मिळ खजिना: छत्रपती संभाजीनगर येथील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १० व्या शतकापासूनची सुमारे ३ लाख ७० हजार दुर्मिळ पुस्तके उपलब्ध आहेत. - नुकत्याच झालेल्या उपक्रमांतर्गत संभाजीनगरमध्ये १४ हजारांहून अधिक पुस्तकांचे वाटप करून बाबासाहेबांना 'विचारांची आदरांजली' वाहण्यात आली.
"पुस्तके ही मानवी प्रगतीचा आधार आहेत. जो वाचतो, तोच विचार करतो आणि जो विचार करतो, तोच बदल घडवू शकतो."

0 टिप्पण्या