श्रीरामपूर- शहरात गोंधवणी परिसरात राहणाऱ्या प्रशांत देविदास कहाणे (वय ३१ ) यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत प्रशांत कहाणे (रा. कुंभार गल्ली महादेव नगर गोंधवणी) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपल्याकडे आपला मित्र अविनाश वारुणगसे (रा. सिन्नर ) यांची महेंद्र स्कॉरपिओ नं. एम.एच. १५ ईई ०७३८, ही वापरण्यासाठी आहेत.काल सोमवारी रात्री ९.३० वाजता सदर स्कॉरपिओ मधून बेलापूर-श्रीरामपूर रोडवरील दुकानातून छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे गोंधवणी येथे घरी जात असताना एज्युकेशन शाळेजवळ त्रिमूर्ती ग्लास अँड अँल्युमिनियम वर्क दुकानासमोर ९.४५ च्या सुमारास रोडवर दोन मोटारसायकली आडव्या लावलेल्या होत्या.
एका बाजूला सहा-सात इसम हातात लाकडे दांडे, लोखंडी रॉड घेऊन उभे होते.तसेच एकाच्या हातात बंदुकीसारखे काहीतरी दिसले. आपण त्याकडे दुर्लक्ष करून गाडीतून पुढे जात असताना त्यांनी अचानक लाकडी दांडे गाडीवर मारले त्यामुळे आपल्याला मारणार या भितीने आपण तेथून जोरात गाडी काढली तेंव्हा काहींनी माझा पाठलाग सुरू केला.
आपण गोंधवणी भैरवनाथनगर - फरगडे वस्ती सुतगिरणीमार्गे पोलीस स्टेशनला दाखल झालो होतो. घडलेला प्रकाराबद्दल पोलिसांना सांगितले.
सदर घटनेबाबत आपण माहिती काढली असता त्यामध्ये अर्जुन दाभाडे व त्याच्या टोळीचे लोक असल्याचे समजले.प्रशांत कहाणे याच्या फिर्यादीवरुन अर्जुन दाभाडे, किरण बोरकर, विकी ढमके, नमोद कांबळे, विवेक दाभाडे व इतर चार ते पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला.

0 टिप्पण्या