शेवगाव येथे मावा विक्री जोरात स्थानिक पोलिसांचे मात्र दुर्लक्ष कारवाईची मागणी

 

शेवगाव शहर प्रतिनिधी- शेवगाव येथे मावा विक्री जोरात सुरू असून स्थानिक पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष या मावा विक्री विरोधात कारवाई कोण करणार असा सर्वसामान्य प्रश्न विचारत आहेत. सुगंधी सुपारी विक्रीस प्रतिबंध असतानाही त्यापासून मावा बनवून चौका चौकात वीस रुपये ते 50 रुपयांपर्यंत हा मावा शेवगाव शहरात सर्रास विकला जात आहेत. एकीकडे नशा मुक्त महाराष्ट्र अशा घोषणा करायच्या आणि मावा सारख्या मनुष्याच्या आरोग्याला हानिकारक असणाऱ्या घटकाला उत्तेजन द्यायचे हे चित्र शेवगाव शहरात बघायला मिळत आहे. या मावा विक्रीतून कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असून पोलीस या माव्याच्या विरोधात कोणतीही कारवाई करताना सध्या तरी दिसत नाही. अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार सुगंधी सुपारी ला बंदी असतानाही शेवगाव शहरात मात्र बिनधास्त खुलेआम मावा विकला जात आहे. मावा खाणाऱ्यामध्ये तरुण, म्हातारे तसेच महिलाही व्यसनाधीन झालेल्या दिसत आहे त्यातून अनेक जणांना कॅन्सर तोंडाचे आजार आदी रोगांचा विळखा सर्वसामान्य जनतेला बसत आहे. मात्र पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे मावा विक्रेत्यांवर कारवाई सहसा होत नाही ही सत्य परिस्थिती आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या आयुक्त पदी तुकाराम मुंढे नियुक्त झाल्यानंतर मावा विक्री संपूर्णपणे बंद होईल असे वाटले होते मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंडे यांच्या आदेशाला हरताळ फासल्याचे दिसत आहे. शेवगाव शहरातून मावा विक्री पूर्णपणे बंद व्हावी हीच सर्वसामान्य जनतेची इच्छा असून तुकाराम मुंडे यांनी लक्ष घालून मावा विक्री करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या