श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगर परिषदेला प्रशासकीय काळात एक आणि मागील महिन्यात एक अशा गुरखा मॉडेलच्या दोन अग्निशामन वाहन शासनाकडून मिळाले परंतु त्या दोन्ही अग्निशमन वाहनांची क्षमता फक्त तीनशे लिटर पाण्याची आहे. त्यामुळे सदर वाहनांचा पाहिजे तसा उपयोग नगर परिषदेला होत नसल्याने लवकरच नवीन अग्निशमन खरेदी करणार असल्याचे आरोग्य विभागाचे सभापती दिपक वमने यांनी सांगितले आहे.
सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर होती त्यामुळे आपल्यासह जिल्यातील अनेक नगरपालिका च्या कचरा डेपोला आग लागली आहे. त्यावर प्रशासन लक्ष ठेऊन सदरची आग कशी आटोक्यात येईल यासाठी प्रयत्नशील आहेत.प्रशासकीय काळात जे अग्निशमन वाहन खरेदी केले त्यात सातत्याने तांत्रिक बिघाड होत आहेत. त्यामुळे या वाहन खरेदी मध्ये झालेल्या गैरव्यव्यवहार बाबत स्वातंत्र चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे वमने यांनी सांगितले. आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूरातील जनतेच्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे देखील सभापती दीपक वमने यांनी सांगितले आहे.

0 टिप्पण्या