तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी- शिरुर शहरातील काजल प्रदीप ओव्हाळ या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे विवाहितेचा पती प्रदीप ज्ञानेश्वर ओव्हाळ, सासू रंजना ज्ञानेश्वर ओव्हाळ व नणंद सुषमा पाडळे या तिघांवर विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर शहरातील गोलेगाव रोड लगत सुंदर सृष्टी सोसायटी समोर राहणाऱ्या काजल ओव्हाळ हिस पती व सासू वारंवार घरगुती कारणातून त्रास देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते, तर काजल हिची नणंद सुषमा पाडळे हि वारंवार घरी येऊन काजलला शिवीगाळ, दमदाटी करुन तिचा छळ करत होते, तर काजल हिने २७ जून रोजी पती, सासू व नणंद यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, सदर घटनेत काजल प्रदीप ओव्हाळ (वय २५ वर्षे रा. शिरुर गोलेगाव रोड ता. शिरुर जि. पुणे) हिचा मृत्यू झाला, याबाबत भिम्दास तुकाराम रोकडे (वय ६२ वर्षे सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. वीर ता. पुरंदर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी विवाहितेचा पती प्रदीप ज्ञानेश्वर ओव्हाळ व सासू रंजना ज्ञानेश्वर ओव्हाळ (दोघे रा. शिरुर गोलेगाव रोड ता. शिरुर जि. पुणे) व नणंद सुषमा पाडळे (रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे) या तिघांवर गुन्हा दाखल करत प्रदीप ज्ञानेश्वर ओव्हाळ यास अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते हे करत आहे.
.jpg)
0 टिप्पण्या