ब्रिटिशकालीन श्रीगोंदा दुय्यम कारागृहात मोबाईलचा शिरकाव; सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह



श्रीगोंदा प्रतिनिधी :- ब्रिटिशकालीन श्रीगोंदा दुय्यम कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. कारागृहातील बराक क्रमांक ४ मध्ये एक छोटा मोबाईल फोन आढळून आल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तहसील कार्यालय अंतर्गत पोलीस ठाण्याच्या निगराणी मध्ये ब्रिटिशकालीन दुय्यम कारागृह आहे या दुय्यम कारागृहात एकूण चार बराक असून त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त आरोपी आहेत त्यातच आज दुय्यम कारागृहातील बराक क्रमांक चार मध्ये एक छोटा मोबाईल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे हा मोबाईल नेमका कारागृहात कसा पोहोचला, तो कोणाचा होता आणि त्याचा वापर कोण करत होते, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी उघड झाल्याची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, कारागृहाच्या सुरक्षेसाठी नियुक्त असलेले चार पोलीस गार्ड, जेलर तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे. नियमित तपासणी, कैद्यांची झडती आणि सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असताना मोबाईल आत कसा पोहोचला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणात केवळ मोबाईल जप्त करून कारवाई करण्यापेक्षा तो कारागृहात पोहोचविण्यामागील साखळी उघड करणे, संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका तपासणे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत कारागृह प्रशासन किंवा पोलिसांकडून अधिकृत माहिती अथवा स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
चौकट
बराख क्र४ समोर छोटा मोबाईल सापडला आहे - जेलर 
श्रीगोंदा दुय्यम कारागृहात बराख क्र ४ मध्ये मोबाईल सापडला असून तो कोणाचा आहे याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असेही जेलर बाबुराव कारखिले यांनी बोलताना सांगितले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या