झरेकाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे
जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनाला तीव्र वेदना झाल्या. आपल्या कसदार अभिनयातून असंख्य व्यक्तिरेखांना जिवंत करणारा प्रतिभावंत कलावंत आणि शेतकऱ्यांप्रती संवेदना असणारा दिलखुलास मित्र आपण गमावल्याची भावना जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
नानांचा अभिनय म्हणजे सहजता, वास्तववाद आणि प्रभावी अभिव्यक्तीचा अनोखा संगम होता. 'नटसम्राट' आणि 'क्रांतीवीर' सह त्यांच्या अनेक भूमिका रसिकांच्या स्मरणात कायम राहतील.नानांशी अतिशय आपुलकीचे आणि मैत्रीचे ऋणानुबंध होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत राज्यातील जलसंपदा कामे व दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या प्रयत्नांमध्ये योगदान देण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती.'नाम फाउंडेशन' च्या माध्यमातून जलसंधारण व शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देणारे नाना खऱ्या अर्थाने माणुसकीचा चेहरा होते. नानांच्या निधनाने भारतीय कलाविश्वातील एक तेजस्वी पर्व संपले आहे. नानांना भावपूर्ण श्रद्धांजली.

0 टिप्पण्या