स्व.दिगंबरराव बागल शिक्षक सहकारी पतसंस्थेकडून डॉ.रणजित राऊत यांचा विशेष सत्कार




 राशीन:  ऋषभ परदेशी प्राणिशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त करून जैवविविधता संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक डॉ. रणजित रावसाहेब राऊत यांचा स्व. दिगंबरराव बागल शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन  विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, सचिव तसेच सर्व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

डॉ.रणजित रावसाहेब राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून प्राणिशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. तसेच त्यांनी जैवविविधता,वन्यजीव संरक्षण,पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत.

यावेळी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.राऊत यांच्या संशोधन कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातून पुढे येऊन संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉ.राऊत यांचा सत्कार हा विद्यार्थी व युवा संशोधकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमास पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य तसेच शिक्षक व सभासद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या