वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर छापा ; चालकासह तरुणीला अटक

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

राहुरी : तालूक्यातील राहुरी खुर्द येथे वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या हाॅटेल न्यु भरत येथे पोलिस प्रशासनाने छापा टाकून एका तरूणीसह दोन ते तीन ग्राहक व व्यश्या व्यवसाय चालविणाऱ्या मालकाला ताब्यात घेतले.
   

श्रीरामपूर येथील आयपीएस अधिकारी आयुष नोपानी,अभिनव त्यागी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनी ( दि १९ ), नोव्हेंबर रोजी यांनी ही कामगिरी केली. 
         गेल्या अनेक दिवसापासून राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेल न्यु भरत या ठिकाणी राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाची खबर पोलिस प्रशासनाला गुप्त खबऱ्या मार्फत मिळाली. त्यानुसार (दि १९ ), नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आयुष नोपानी, अभिनव त्यागी तसेच श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी ताबडतोब पोलिस नाईक रंगनाथ ताके, गणेश फाटक, चालक लक्ष्मण बोडखे, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी,अशोक कुदळे तसेच महिला पोलिस हवालदार नूतन काळखेर, आदी फौजफाट्यासह हाॅटेल न्यु भरत येथे छापा टाकला. यावेळी अगोदर दोन जणांना डमी ग्राहक म्हणून हाॅटेलमध्ये पाठविण्यात आले. आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री करून घेतली. खात्री झाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली.        

यावेळी हाॅटेल चालक सय्यद फरहाद इर्शाद अहमद (वय ३२), (रा पाण्याची टाकी, नगर मनमाड रोड राहुरी ), यांच्या सह वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याबाबत राहुरी पोलिसात सायंकाळी उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here