अंधार झाला की पेंग्वीन गँगची पार्टी सुरू

नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंवर टीका


मुंबई : ‘महाविकास आघाडी सरकारने नाईटलाईफ जास्तच मनावर घेतली आहे. त्यामुळे इतके वीज बिल लोकांना आले की कोणीच भरु शकणार नाही. मग काय अंधारच अंधार होणार’ अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर वीज बिलाबाबत वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही व्टिट करत आघाडी सरकार आणि नाईटलाईफ वरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टिकास्त्र सोडले आहे. सगळीकडे अंधारच अंधार झाला की पेंग्वीन गँगची पार्टी सुरू, असे म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढला.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here