तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसू –  भाजपचा ईशारा 


मुंबई : आपल्या गलथान कारभारामूळे संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू असा  ईशारा  भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
         

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयावर काढलेल्या भव्य मोर्चाच्या वेळी बोलताना आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षात असलेला बेबनाव पुराव्यानिशी सर्वांसमोर मांडला.

राज्याचे उर्जा मंत्र्यांनी वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे वारंवार आश्वासन दिले. परंतु उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलांत सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी नकार दिला आहे. श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे दुष्पाप हे महाविकास आघाडी सरकार करीत आहे. परंतु जो पर्यंत राज्यातील जनतेला 300 युनिट पर्यंतची सवलत व वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही तो पर्यंत भारतीय जनता पक्षाचे हे आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा सुद्धा आ. भातखळकर यांनी दिला आहे.
         

तसेच, कोरोनाच्या काळात भरमसाठ व अंदाजे वीज बिल अदा करणाऱ्या ठाकरे सरकारला आगामी काळात महाराष्ट्रातील जनता ‘शॉक’ दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास  आ. भातखळकर यांनी व्यक्त केला.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here