‘खोदा पहाड निकला चुहा’ अशी ही फसवी योजना

मुंबई : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलेली शेतकरी वीज बिल माफीची घोषणा ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशा प्रकारची आहे, अशी टीका भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी केली आहे.

पाठक यांनी सांगितले की, राज्य सरकार स्वतःच्या खिशातला एक पैसाही बाहेर न काढता शेतकऱ्यांना वीज बिल माफी देणार आहे. ही घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची उघड उघड फसवणूक आहे. शेतकऱ्यांनी थकीत बिल भरले तर तेवढ्या रकमेचे क्रेडिट सरकार देणार आहे. मुळात शेतकऱ्यांकडे बिल भरण्यासाठी पैसेच नाहीत. विविध कारणांनी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना थेट मदत करायची सोडून हे सरकार थकीत बिल माफी योजनेसारखे हातचलाखीचे खेळ करीत आहे.


सरकारच्या मनात खरंच शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा असेल तर थेट मदत दया, असेही श्री पाठक यांनी नमूद केले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here