न्यूझीलंडचा गोलंदाज हेझलडीन कॅन्सरग्रस्त

न्यूझीलंड ः न्यूझीलंडचा 26 वर्षीय वेगवान गोलंदाज अँड्र्यू हेझलडीन याला कर्करोग झाला असून आता त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या तो कँटरबरीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याला सप्टेंबरमध्ये हॉजकिन लिम्फोमा या प्रकारचा कर्करोग असल्याचे निदान झाले. या कर्करोगामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. हा कर्करोगाचे इंफेक्शन जसे वाढत जाते तशी रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे ताप येणे, रात्री घाम फुटणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. पण सुदैवाने हेझलडीनच्या कर्करोगाचे निदान लवकर झाले असल्याने तो बरा होण्याच्या शक्यता अधिक आहेत.
कँटरबरी क्रिकेटचे हाय परफॉर्मन्स मॅनेजर मार्टि क्रोय म्हणाले की ’नक्कीच ही अँड्र्यू साठी वाईट बातमी आहे. आम्ही या कठीण परिस्थितीत त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या बरोबर आहोत. आम्ही त्याच्या उपचारादरम्यान नेहमीच त्याच्या पाठीशी राहू. आशा आहे की तो लवकरण पूर्ण तंदुरुस्त होऊन पुढच्या वर्षी खेळायला येईल.
हेझलडीनने 2018 मध्ये कँटरबरीकडून पदार्पण केले होते. त्याने 14 प्रथम श्रेणी सामने आत्तापर्यंत खेळले असून 35 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 16 अ दर्जाच्या सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत. आता या हंगामासाठी त्याच्याऐवजी कँटरबरी संघात जॅक्सन लॅथमचा समावेश झाला आहे.

4 COMMENTS

  1. Thank you, I have recently been searching for information approximately this subject for ages and yours is the best I’ve found out so far. However, what in regards to the conclusion? Are you positive about the supply?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here