जनावरांचे शेण काढत नाही म्हणून, तरुणाला मारहाण!

अनगरे येथील घटना. ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल.

श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील अनगरे येथे वीस वर्षीय तरुणास लोकांच्या गोठ्यातील जनावरांचे शेण काढतो. मात्र, आमच्या जनावरांचे शेन काढत नाही. याचा राग अनावर होऊन मागासवर्गीय तरुणाला जबरी मारहाण करण्यात आली आहे. शिवाय शेण काढले नाही तर जीव मारून टाकीन अशी धमकी पीडितास देण्यात आली आहे. या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील अनगरे या ठिकाणी दिनांक २० नोव्हेंबर रोजी सोमनाथ बाप्पू जोगदंड हा तरुण संध्याकाळी आठ वाजता घरी रडत ओरडत आला. याबाबत घरच्यांनी विचारणा केली असता, त्याने नमूद प्रकार सांगितला. लोकांच्या गोठ्यातले शेन काढतो, आमच्या जनावरांचे शेण काढायला येत नाही. म्हणून, अजनुज रोडवर लाकडी दांडक्याने सोमनाथला मारहाण करण्यात आली.

ऋषिकेश घोलप याने ही मारहाण केली आहे. शिवाय पीडिताच्या घरासमोर मोटर सायकलवरून जाऊन ऋषिकेश घोलपने घरच्या लोकांना दरडावून सांगितले की, सोमनाथला शेन काढायला सांगा, नाहीतर ! मी त्याला जीव मारुन टाकील, म्हणत घरच्यांनाही शिवीगाळ करीत अश्लील भाषा वापरली.नमूद घटनेनंतर पीडितांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद नोंद केली असून, ऋषिकेश दत्तू घोलप राहणार अनगरे तालुका श्रीगोंदा, याच्या विरोधात भा.दं.वि.कलम ३२४, ५०४, ५०६ तसेच ॲट्रॉसिटी चे ३(१)r व ३(१)s नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दाखल केला असून, पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव पुढील तपास करीत आहेत.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here