संगमनेर येथे गुटखा जप्त

संगमनेर : शहरात मालदाड-रोड परिसरातील सार्थक ट्रेडर्स या दुकानावर संगमनेर शहर  पोलिसांनी छापा टाकून गुटखा व तंबाखु असा10 हजार 574 रुपयांचा मुद्देमाल काल सायंकाळी जप्त केला असून, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील पो कॉ.अमित महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल नामदेव दिघे (रा.अंबर कॉलनी, मालदाड रोड, संगमनेर) यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 शहरातील मालदाड रोड वरील अनिल दिघे याच्या सार्थक ट्रेडर या दुकानावर शहर पोलीस पथकाने छाप मारून या दुकानातून विविध कंपन्यांचा गुटख्याच्या पुड्यांचे बंडल तसेच तंबाखूचे पॉकेट असा एकूण 10 हजार 574 रुपयाचा माल जप्त केला आहे. यापुढील तपास
शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संंगमनेर पोलीस करत आहेत

  संगमनेर शहरातील काही दुकानात तसेच पान टपरी तेथे गुटखा बिनधास्तपणे विक्री केला जात असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, शहर पोलीस ठाण्यातून या एकच ठिकाणी कारवाई का झाली ? इतर ठिकाणी कधी कारवाई होणार तसेच शहरातील मोठ्या “गुटखा किंगवर” कधी कारवाईला मुहूर्त लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here