मोठ्या पडद्यावरील कलाकारानंतर आता छोट्या पडद्यावरील कलाकारही ड्रग्जच्या विळख्यात

मुंबई :  ड्रग्सचे प्रकरण बॉलीवूड पासून आता टीव्ही ॲक्टर पर्यंत पसरू लागले आहेत या ड्रग्स च्या राक्षसाने कोणत्याच कलाकारांना सोडलेला दिसत नाही आता नवीन नवीन नावं समोर येऊ पाहत आहेत त्यातच भारती सिंग ला देखील अटक झाली आहे . शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) कॉमेडियन भारती सिंह ला ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आली. अटकेपूर्वी तिच्या आणि पती हर्षच्या घरी आणि कार्यालयात छापेमारी करण्यात आली. यात असा आरोप आहे की 86.5 ग्रॅम गांजा आणि अन्य ड्रग्स जप्त करण्यात आल्या. गेल्या महिन्यात एनसीबीने आणखी एक टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानलाही ड्रग्स घेण्याच्या आरोपात अटक केली होती.

सप्टेंबर महिन्यात अभिनेत्री सनम जोहर (Sanam Johar) आणि ऐबिहेल पांडे विरोधातही ड्रग्सची नशा केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यांच्या घरात टाकलेल्या छापेमारीत ड्रग्ज मिळाली होती.

याची सुरुवात सुशांत सिंह (Sushant Sigh) याच्या मृत्यूच्या तपासादरम्यान झाली. यामध्ये रिया चक्रवर्ती (Reha Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात 30 जणांचा अटक करण्यात आली. ज्यामध्ये निर्मात क्षितिज प्रसाद (Kshitij Prasad) हे मोठं नाव आहे. दुसरीकडे एनसीबीने आतापर्यंत दीपिका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीती सिंह आणि अर्जुन रामपाल यांचीही चौकशी केली आहे. मात्र छोट्या कलाकारांनाच अटक करण्यात आली आहे.

जर गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर ड्रग्स बाबात बॉलिवूडमध्ये एक हत्याही झाली होती. चित्रपट अभिनेत्री कृतिका देसाईबाबत असे म्हटले जात होते की तिने काही ड्रग्स पॅडलर्सचा पेमेंट केला नव्हता. त्यामुळे पेडलर्सनी तिची हत्या केली. ही केस वांद्रे क्राइम ब्रान्च सीनिअर इम्स्पेक्टर नंदकुमार गोपाले यांनी डिटेक्ट केला होता. ज्या दिवशी एनसीपी दीपिका पादुकोनची चौकशी करीत होती, त्या दिवशी गोपाले यांनी उस्मान शेख नावाच्या एक ड्रग्ज सप्लायरला अटक केली होती. जो टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये ड्रग्ज सप्लाय करण्याचं काम करीत होता.

स्लिम राहण्यासाठी करतात नशा

उस्मान याने गोपाले यांच्या चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे केले होते. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज इतक्या प्रमाणात का घेतली जाते? उस्मानने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये हे मिथ आहे की ड्रग्सची नशा केल्याने स्लिम राहता येतं. हिट चित्रपट देण्यासाठी, अधिक काळासाठी टिव्ही मालिका वा अन्य शओमध्ये टिकून राहण्यासाठी स्लिम होणं आवश्यक असतं. यासाठी ड्रग्सची नशा केली जाते. उस्माने चौकशीदरम्यान असंही सांगितलं की, याबरोबरच आणखी एक मिथ असं आहे की, ड्रग्सची नशा केल्यामुळे सेक्सची इच्छा वाढत राहते. यासाठीदेखील ड्रग्सची नशा केली जाते. तिसरं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे येथे अधिकतर लोक ड्रग्स घेतात. त्यामुळे जे ड्रग्स घेत नाहीत त्यांना वाटतं की आपण करिअरमध्ये जास्त काळासाठी येथे टिकू शकणार नाही, त्यामुळे तेदेखील ड्रग्सची नशा करू लागतात. एनबीटीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सीनिअर इन्स्पेक्टर नंदकुमार गोपाले यांनी सांगितलं की, बॉलिवूडमध्ये ज्याचा जितका मोठा दर्जा तो महाग ड्रग्स खरेदी करतो. जे मोठे हीरो आहेत ते कोकेन वा या प्रकारची दुसरी महागडी ड्रग्स घेतात. जे थोडे कमी बजेटचे कलाकार आहेत, ते एमडी सारखी ड्रग्स घेतात. ज्याची कमाई एकदम कमी आहे, ते गांजा चरस वगैरे घेतात. मात्र अनेक ठिकाणी अपवादही असतात. जसं दीपिका पादुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाशचा जो व्हॉट्सअॅप चॅट लीक झाला होता, त्यात वीड आणि हॅश शब्दांचा उल्लेख आहे. हॅशचा अर्थ हशीस ड्रग्सशी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here