बापरे! डॉक्टरांनी तरुणावर केली यशस्वी शस्त्रक्रिया, पोटातून काढली 24 किलोची गाठ

नवी दिल्ली : अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज मधील डॉक्टरांनी एका रूग्णाच्या पोटातून 24 किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढली आहे. अलीगढ जिल्ह्यातील छर्रा येथील रहिवासी असलेले 45 वर्षीय सीताराम जवळजवळ दीड वर्षांपासून त्यांच्या पोटात हा ट्यूमर घेऊन फिरत होते. प्रा. सय्यद हसन हॅरिस (सर्जरी विभाग) यांच्या देखरेखीखाली डॉ. शाहबाज हबीब फरीदी यांच्या नेतृत्वात सर्जन्सच्या पथकाने, एका कठीण सर्जरीद्वारे, हा ट्युमर पोटातून काढून टाकला.
प्रा. हसन हॅरिस म्हणाले, सीताराम हे 2018 पासून त्यांच्या ट्यूमरच्या वेदनांनी त्रस्त होते. त्यावेळी, त्यांच्या पोटात दुखायचं, परंतु ते कशामुळे हे त्यांना माहीत नव्हते. वेदनांचे उपचार करण्यासाठी त्यांनी पेनकिलर घेतल्या. त्यांच्या पोटाच्या एका बाजूकडे दुखून मग दुसर्या बाजूकडे व नंतर पोटाच्या मध्यभागी दुखणं जायचं, ज्यामुळे त्यांना दैनंदिन कामंही करणं कठीण झालं होतं. सीताराम यांनी उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील रुग्णालयांमध्ये उपचारही घेतले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. खासगी मोठी रुग्णालयं अत्याधिक फी मागत होती आणि महामारीच्या रूग्णांच्या लोडमुळे अनेक छोटी हॉस्पिटल त्यांना उपचार देत नव्हती.
प्रो. हसन हॅरिस म्हणाले, जेव्हा सीताराम जेएनएमसीला पोहोचले तेव्हा आम्ही ताबडतोब त्यांची प्री-सर्जरी तपासणी केली. चाचण्यांमध्ये असे दिसून आले की सर्जरी हा एकमेव पर्याय होता, जो दुर्मीळ आणि धोकादायक होता कारण हा घातक ट्यूमर त्यांच्या मुख्य अवयवांना दाबत होता.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here