दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट अनिवार्य

मुंबई : मिशन बिगीन अगेन अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या वतीने नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान ४ दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

चार राज्यातून ट्रेन व हवाई मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना निगेटीव्ह रिपोर्ट सादर करावा लागेल. रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची बॉर्डरवरच्या चेकपोस्टवर तपासणी केली जाईल.

‘ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील, त्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर त्या प्रवाशाला कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचाराचा खर्च त्यालाच करावा लागेल’ असे एसओपीमध्ये म्हटले आहे.

आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्टचा अहवाल ज्या प्रवाशांसोबत नसेल त्यांना विमानतळावर आल्यानंतर ती टेस्ट करावील लागेल.

विमानतळांनी यासंदर्भातले टेस्टिंग सेंटर्स उभारले पाहिजेत. या चाचणीचे शुल्क प्रवाशांकडून घेण्यात येईल.अशाच प्रकारची नियमावली रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here