ओाला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच कचरा गाडी मध्ये टाकावा

जयप्रकाश सातव पाटील यांचे नागरिकांना आवाहन

कैलास पवार । राष्ट्र सह्याद्री

वाघोली – आरोग्याच्या दृष्टिकोनातून कचऱ्याची विल्हेवाट लावावी. त्यासाठी ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण करूनच कचरा गाडी मध्ये कचरा टाकावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य व पुणे जिल्हा भाजपा व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष जयप्रकाश सातव पाटील यांनी केले.

ग्रामपंचायतीच्या वतीने मॅजेस्टिक सिटी सोसायटी येथे ओला व सुका कचरा साठीचे डस्टबिन वाटप कार्यक्रमात सातव पाटील बोलत होते. यावेळी माणिक दादा सातव पाटील, ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई कटके व नागरिक उपस्थित होते. स्वच्छ वाघोली, सुंदर वाघोली करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंतीही यावेळी सातव पाटील यांनी केली. ओला व सुका कचरा स्वतंत्र ठेवण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने डस्टबिन वाटप झाले त्याबद्दल सोसायटी धारकांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here