जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील महिलांना शिलाई मशीनचे वाटप

बचतगटाच्या महिलांसाठी मॉल उभारनार-नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर

राष्ट्र सहयाद्री । प्रतिनिधी

बीड : महिलांना रोजगार निर्मिती करण्यासाठी मुंबई येथील आनंद मार्ग प्रचारक संघ या संस्थेच्या माध्यमातून ट्रेनिंग सेंटर आणि कच्च्या मालापासून पक्का माळ तयार करून विधवा, परित्यक्ता,गरजू महिला यांना कुटुंब चालवण्यासाठी उत्पन्न मिळावे या उद्देशाने बीड शहरात मोठ्या प्रमाणात महिलांचे सोशल युनिट तयार करण्यात आले आहे. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात 150 महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई हायकोर्टाचे निवृत्त सरन्यायाधीश श्री अंबादास जोशी, बीड नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर रोटरी क्लब बीड चे अध्यक्ष जनार्दन राव सर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले.

महिलांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शाळेतील मुलांचे युनिफॉर्म महिला साठी लेडीज गारमेंट तयार करून भविष्यात कुटुंब चालवण्यासाठी या शिलाई मशीनचा उपयोग केला जाणार आहे. येणाऱ्या वर्षभरात अंदाजे एक हजार महिलांना रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. तसेच ज्या मुलीचा फॅशन डिझाईन कोर्स सुरू आहे अशा विद्यार्थ्यांनीकडून या महिलांना मोफत ट्रेनिंग देणार आहे.शिवाय हे युनिट सुरू करण्यासाठी आनंद मार्ग प्रचारक संघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात नवीन कपडा म्हणजे कच्चामाल पाठवण्यात आला असून काज, बटण देखील पाठवण्यात आली आहे .

यावेळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शहरातील नागरिकांना वस्तू, कापड कमी दरात आणि चांगल्या दर्जाचे आपल्या वतीने देण्याचा प्रयत्न करावा. बचत गटाच्या माध्यमातून या महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे स्टॉल लावून विक्री करण्यात येईल असे देखील सांगितले. त्यासाठी अहिल्याबाई होळकर सभागृह याठिकाणी बचतगटासाठी मॉल उभारनार असल्याचे यावेळी सांगीतले.

राजू वंजारे व्यवस्थापक, शालीनी परदेशी, कल्याण गोरे,यश वंजारे काळजीवाहक बेघर निवारा केन्द ,बीड. यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here