वांगी ते सिरसाळा जुना पांदण रस्ता व आनंदगाव येथील रस्ता शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी वैशाली पाटील यांनी खुला केला

माजलगाव : बळीराजाच्या पाचवीलाच पुंजलेल्या समस्या संपता संपत नाहीत शेतकऱ्याला शेतीची मशागत कामासाठी इतरांच्या बांधावरून ये जा करावी लागत असते. शेतात रस्ताच नसेल किंवा शेजारचा शेतकरी जाणीवपूर्वक अडवणूक करीत असेल अशा परिस्थितीत अडचणीत आलेला शेतकरी भांबावून जातो. काय करावे काही सुचत नाही त्यामुळे शेतीच्या बांधावरुन ये-जा करण्याच्या कारणावरून दोघांमधील वाद विकोपाला जातो.

एखादा शेतकरी समजदार असेल तर तो तो शेतकरी प्रशासनाकडे रीतसर अर्ज करून यातून मार्ग काढण्याची विनवणी प्रशासनाला करतो असाच एक प्रकार तालुक्यातील आनंद गाव येथील जुना पूर्णा पार रस्ता व वांगी ते सिरसाळा जुना पांदण रस्ता बाबत वाद घडला होता. आनंद गावचे शेतकरी विश्वा बर आगरकर व इतर शेतकरी आणि भास्कर जाय कोबा थावरे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आगरकर यांनी सामायिक असलेली व्हेरी वरील पाण्याच्या कारणावरून तावरे यांनी त्यांच्या शेतालगत असलेला बांध रस्ता आडवून आगरकर व इतर शेतकरी यांना त्यांच्या शेतातूनजाण्यास सक्त मनाई केली होती.

तहसीलदार वैशाली पाटील यांनी या प्रकरणात मोक्यावर जाऊन पाहणी केली असता खरोखर आगरकर व इतर शेतकरी यांना जुना व पूर्ण पार बांद रस्त्यावरून ये-जा करण्यास थावरे यांनी सक्त मनाई केल्याचे निदर्शनास आले.

तसेच दुसरी घटना वांगी ते सिरसाळा जुना पांदण रस्ता हा असतानाही राहुल राजेंद्र तायडे ,आशिष तायडे ,वहीतदार ज्ञानोबा चव्हाण यांनी या पांदन गाडी त्यावर तारेचे कंपाउंड करून व इतर अडथळे निर्माण करून आजूबाजूचे शेतकऱ्यांची नाहक जाणीवपूर्वक अडवणूक केली होती.

या प्रकरणाची रीतसर तक्रार अंकुश भगवान ठोंबरे व इतर शेतकऱ्यांनी मिळून रीतसर तक्रार केली होती. शेतात मशागत करण्यासाठी वहिवाट करण्यासाठी रस्त्याची अत्यंत गरज असते. शेती कसायला शेतात जायला रस्ताच नसेल तर शेतकरी शेतात जाणारच कसा हा मोठा प्रश्न निर्माण होतो.

त्यामुळे या दोन्ही प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलमान्वये 143 या अधिकाराचा वापर माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी या दोन्ही प्रकरणातील पांदनगाडी रस्ता व जुना पुर्णापार रस्ता खुला करून दिला आहे. रस्त्यावाचून शेतात जाण्यासाठी अडचणीत आलेल्या शेतकर्यांनी याबाबत समाधान मानून या निर्णयाने आनंदाने भारावून गेल्याचे दिसून आले.

वैशाली पाटील तहसीलदार, माजलगाव

एक शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकरी बांधवांची बांध रस्त्यावरून किंवा इतर कारणावरून विनाकारण अडथळे जाणिवपुर्वक करणे ही लाजिरवाणी बाब आहे….

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here