अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक पोलिसांनी पकडला

प्रतिनिधी | राष्ट्रसह्याद्री

कर्जत :     दि.२२रोजी सायंकाळी पोलीस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारात एक दहा टायर हायवा हा वाळू भरून चालला आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस उपधीक्षक जाधव यांनी आपले कार्यालयीन पथकाला पाचारण करून गोपनीय बातमी कळवून कार्यवाहीकामी नांदगाव शिवारात पाठविले असता त्यांना एक पिवळ्या रंगाचा दहा टायर भारत बेंझ कंपनीचा हायवा (एम. एच.४२एक्यू८८२५)हा अवैध वाळू वाहतूक करताना मिळून आला .

कर्जत पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतूक केल्या प्रकरणी भादवि कलम ३७९पर्यावरण संरक्षण अधिनियम ३/१५अनव्य पोकॉ.इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गौणखनिज हे कोठून आणले आहे व कोणास विक्रीसाठी घेऊन जात आहेत .

याबाबत पुढील तपास पोना.भाऊसाहेब यमगर हे करीत असून सदरची कारवाई पोलीस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ.गौतम फुंदे, पोकॉ.इरफान शेख, पोना. केशव व्हरकटे,पोकॉ.शामसुंदर जाधव, होमगार्ड नय्युम पठाण यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here