पैसे न दिल्याच्या कारणावरून दांडे व लोखंडी गंज वापरून हाणामारी

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

कोल्हार खुर्द : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील भांडण, मारामारी, हे संपूर्ण जिल्ह्यात सर्वसृत आहे.     या गावातुन होणारी वाळूतस्करी, खाजगी सावकारकी यासर्व प्रकाराला कारणीभूत असल्याचे देखील गावातील अनेकांना माहिती आहे. मात्र,(दि 22 ),नोव्हेंबरच्या रात्री या सर्वाची परिसीमा गाठत काही पैसे उसने घेतल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना लाकडी दांडके,लोखंडी गंज, अशा साहित्याने जबर मारहाण करत गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली. 

    याबाबत सविस्तर समजलेली माहिती अशी कि, एकाच गावात राहणारे आणि मित्र असणारे तरुण यांनी एकमेकांकडून उसनवारी केली होती, हे उसने पैसे परत घेण्याच्या कारणावरून गावातील रेणुका नगर परिसरात राहत असलेले, संकेत पवार, महेश पवार, ईश्वर टिळेकर,आकाश शिरसाठ यांनी जवळच राहत असलेल्या जाधव कुटुंबीय यांच्याकडे काही पैसे उसने दिलेले होते, हे पैसे वेळेवर जाधव यांनी परत केले नाही, त्यामुळे जाधव कुटुंबीय आणि महेश पवार यांची किरकोळ बाचाबाची गावात झाली होती.  
     

मात्र, आपले पैसे वेळेवर मिळाले नसल्याचा राग महेश याला आवरला नाही, त्याने आपला भाऊ संकेत पवार, ईश्वर टिळेकर, आणि आकाश शिरसाठ या मित्रांना घेऊन पुन्हा (दि 22), नोव्हेंबरच्या रात्री साधारण 9 वाजता जाधव यांच्या घरी गेले, जाधव कुटुंबीय जेवण्यासाठी बसलेले असतानाच वरील सर्वानी जाधव कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करीत आपल्या हातातली लाकडी दांडके, लोखंडी गज आणि पट्टीच्या साहाय्याने जबर मारहाण करीत चंद्रकांत जाधव, शुभम जाधव, चैतन्य जाधव, शांताराम जाधव यांना जबर मारहाण करून जखमी केले, तसेच घरातील संसारुपयोगी वस्तू लाथाळत घराबाहेर फेकून देऊन नासधूस केली, या मारहाणीत जाधव कुटुंबीयांनी रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत राहुरी पोलीस ठाणे गाठले होते.   
     

त्यानुसार वरील आरोपींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयानुसार भांदवि  326,324,427,452,323,504,506,34 अ.जा.ज 1989 व सुधारणा अधिनियम 2015 चे कलम 3(1),(r)(s)/3(2)(5a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके हे स्वतःया प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here