लग्न झालेल्या मैत्रिणीला घरी बोलावून तिच्यावर केला ॲसिड हल्ला

पुणे :  नुकतेच नवीन लग्न झालेल्या आपल्या मैत्रिणीला घरी बोलावून एका मित्राने तिच्यावर ॲसिड हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात पर्वती दर्शन परिसरात लग्न झालेल्या मैत्रिणीला भेटायला बोलवून तिच्यावर अॅसिडसारखे द्रव्य फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्लात नवविवाहित तरुणी (रा. कसबा पेठ, पुणे )गंभीर जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अबुझर आय्याज तांबोळी (रा. पर्वती दर्शन, पुणे) असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी विवाहानंतर तिच्यापतीसोबत दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माहेरी आली होती. आरोपी अबुझर याने तरुणीला भेटण्याच्या बहाण्यानं पर्वती दर्शन येथे बोलावलं होतं.

अबुझरला भेटण्यासाठी तरुणी पर्वती दर्शनमध्ये पोहोचली. आता माझं लग्न झालं आहे. तू माझ्या मागे लागू नको, असं पीडित तरुणीनं आरोपी अबुझरला सांगितलं. मात्र, तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ‘तुझे आपने आपपर गुरूर है ना, देख मै अभी तेरा गुरूर तोड देता हू, असं म्हणत आरोपी अबुझर यांनी अॅसिड सारखे द्रव्य पीडित तरुणीच्या चेहऱ्यावर फेकलं. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तरुणीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दुसरीकडे दत्तवाडी पोलिसांनी आरोपी अबुझर आय्याज तांबोळी याला अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सांगितलं की, प्रेम प्रकरणातून हा हल्ला करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी एअर कंडिशन दुरुस्तीचं काम करतो. या प्रकरणी वैद्यकीय अहवाल मागवण्यात आला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here