पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा

कोल्हार :

राहाता तालुक्यातील कोल्हार येथे राजुरी रस्त्याला जुगार अड्ड्यावर प्रताप दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रविवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला.
         

यावेळी तिरट नावाचा हार – जीतचा जुगार सुरू होता. पोलिसांनी  १७ जणांना ताब्यात घेतले असता येथून ५८ हजार ८५० रुपये रोख रक्कम सहा मोटरसायकल व जुगार साहित्यासह २ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
       

जुगार अड्डा चालक शंकर श्रीपती रोकडे (कोल्हार), सुनील दामू आहेर (कोल्हार), विजय एकनाथ बोरुडे (कोल्हार),बिलाल मन्सूर शेख (कोल्हार), जाकीर कंकर शेख (कोल्हार),तय्यब आलम तांबोळी (कोल्हार), अमजद दाऊद सय्यद (संगमनेर), दिगंबर नाना कोतकर (करजगाव, राहुरी) केशव नाथाजी गायकवाड (कोल्हार),अरुण शंकर शिरोडकर (कोल्हार),अजय संतोष जाधव (कोल्हार), हुसेन चाँद पठाण (फत्त्याबाद )
 कैलास भीमाशंकर म्हसे (शिलेगाव, राहुरी)राकेश जगन्नाथ लोखंडे (कोल्हार), इमरान इलियास पठाण (संगमनेर), सलीम हुसेन शेख (लोणी),तोफिक असलम शेख (कोल्हार)यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
   

लोणी पोलीस ठाण्यात  महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र औटी हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here