30 हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकास रंगेहात पकडले

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाहेडा लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले

जामखेड –

भावावर दाखल झालेल्या गुन्ह्यातुन सुटका व्हावी म्हणून आठ हजार रुपयांमध्ये देवाणघेवाण झाली पण रक्कम कमी असल्याने पोलीसांकडून जास्त रक्कमेची मागणी झाली तीस हजार रूपयांमध्ये मिटले पण जास्त पैसे जातात म्हणून फिर्यादीने नगर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व आज सापळा रचून जामखेड चे पोलीस उपनिरीक्षक सज्जन ना हेडा यांना रंगेहाथ पकडण्यात आले यामुळेच परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

जामखेड पोलीस स्टेशनला पोक्सो गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाची चार चाकी गाडी वापरली त्या गाडी ड्रायव्हर शहाजी तनपुरे ( शिऊर ) वर गुन्हा दाखल झाला होता. ड्रायव्हरचा भाऊ नाना तनपुरे यांनी भावाला वाचविण्यासाठी पोलीसांकडे गेला व दि २८ डिसेंबर रोजी आठ हजार रुपये रोख दिले मात्र दूसऱ्या दिवशी एवढ्या कमी रक्कमेत मिटत नाही म्हणत पोलिसांनी परत दिले.

३१ डिसेंबर रोजी त्या ड्रायव्हरला अटक करून १ जानेवारीला श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलीहोती . भावासाठी नाना तनपुरेंचे प्रयत्न चालूच होते पोलिसांनी नाना तनपुरेला पोलीस स्टेशनला बोलावून एक लाखाची मागणी केली मात्र तीस हजार रुपयांत सेटलमेंट झाले व कोठे द्यायचे ठरले. वैतागून नाना तनपुरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नगरकडे तक्रार अर्ज केला.

दि ५ जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी जामखेड येऊन रितसर तक्रार दाखल करून घेतली व सापळा रचून जामखेड नगर रोडवरील हाँटेल कृष्णाचे मालक कैलास ढोले यांच्या मध्यस्थीने पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाहेडा यांना रंगेहाथ पकडले. जामखेड पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधात्मक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे पोलीस कॉन्स्टेबल तनवीर शेख प्रशांत जाधव वैभव पांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here