अटारी पदभरतीत गैरप्रकार

भाग एक

अटारीत कंत्राटी वरिष्ठ संशोधन

सहकारी पद भरतीत गैरप्रकार

पुणे ः

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अटारी पुणे कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्रात विविध प्रकल्प राबविण्यात येतात. मागील
दोन ते तीन वर्षात राबविण्यात आलेल्या कडधान्य व तेलबिया प्रकल्पामध्ये वरिष्ठ संशोधन सहकारी पदाची दोन पदे भरण्यात आली होती. यातील तेलबिया प्रकल्पामध्ये
वरिष्ठ संशोधन सहकारी या पदाच्या निवडीमध्ये पूर्वी काम करत असलेल्या पल्लवी पालवे यांच्याकडे पात्रता नसताना अटारीचे संचालक लाखन सिंग यांनी
नियुक्ती केल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे.

माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये २० जुलै २०१८ रोजी कृषी मंत्रालयाच्या विविध प्रकल्पाची
अटारी कार्यालयाअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. यामध्ये कडधान्य व तेलबिया प्रकल्पामध्ये वरिष्ठ संशोधन सहकारी दोन पदे, डाटा एंट्री ऑपरेटर
दोन पदे भरण्यात आली. मात्र अटारीच्या संचालकांनी नवीन व्यक्ती न घेता पूर्वी कार्यरत असलेल्या पल्लवी पालवे या महिला कंत्राटी कामगारांची नियुक्ती
केली. विशेष म्हणजे पात्रता नसतानाही या महिलेची नियुक्ती केल्याने संचालकांनी पद भरतीला हरताळ फासला असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

अटारीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषि मंत्रालयाच्या तेलबिया प्रकल्पामध्ये पूर्वी कार्यरत असलेल्या वरिष्ठ संशोधन सहकारी या पदावर पल्लली पालवे
ही महिला कर्मचारी सद्यस्थितीत काम करत होती. ही महिलेला जून २०१७ मध्ये अटारीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदावर पंधरा हजार रुपये वेतन श्रेणीमध्ये रुजू
झाली होती. अटारीमध्ये रुजू होण्याअगोदरच या महिलेने पुणे विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमासाठी (शैक्षणिक वर्ष २०१६ ते २०१८) प्रवेश घेतलेला होता.

या महिलेने २०१६-१८ या कालावधीमध्ये पूर्णवेळ असणारी एमबीए पदवी अटारी पुणे या कार्यालयात काम करत असताना प्राप्त केली. त्यामुळे महिलेने
विद्यापीठासह अटारीच्या संचालकाची दिशाभूल केले असल्याचे दिसून येते. विशेषःहा विद्यापीठाची पूर्ण वेळ असणारी पदवी कॉलेजला रोज उपस्थित राहून
मिळवण्यात अटारीचे डॉ. लाखनसिंग यांनी मदत केल्यामुळेच शक्य झाले असावे अशी जोरदार चर्चा कर्मचारी वर्गामध्ये सुरू आहे.

संबधित महिला कर्मचारी येथेच न थांबता पुणे विद्यापीठाकडून गैरप्रकारे मिळावलेल्या एमबीए या पदवीच्या आधारे अटारीमध्ये २०१८ मध्ये झालेल्या वरिष्ठ
संशोधन सहकारी पद भरतीमधून नियुक्त केली गेली. वरिष्ठ संशोधन सहकारी पद भरतीमध्ये ही महिला कर्मचारी पात्र नसतानाही नियुक्त केली गेली. वरिष्ठ
संशोधन सहकारी पदासाठी कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रम असणारी पदव्युत्तर डिग्री असणारे विद्यार्थीच पात्र होते. परंतु या महिलेकडे पुणे विद्यापीठाकडून
मिळवलेली पात्र नसलेली अकृषी (कृषी व कृषी संलग्न नसलेली) पदव्युत्तर डिग्री (एमबीए) होती. तरीदेखील या महिलेची डॉ. लाखनसिंग यांनी पात्र नसतानाही
नियुक्त केली. विशेष म्हणजे ज्या अकृषिक (एमबीए) डिग्रीच्या आधारे या महिलेची गैरप्रकारे निवड झाली ते डिग्री प्रमाणपत्र सुद्धा मुलाखतीच्या दिवशी
तिच्याकडे नव्हते.

अशाप्रकारे या महिलेने डॉ. लाखनसिंग यांच्या मदतीने १५,००० रुपये प्रती महिना वेतनावरून एकाच वर्षामध्ये थेट ४०,००० रुपये प्रती
महिना वेतन घेऊन गैरप्रकारे झेप घेतली. कृषीचे जे पात्र विद्यार्थी ज्यांनी आतोनात प्रयत्न करून पदव्युत्तर तसेच पीएचडी मिळवलेल्या आहेत. त्यांच्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here