खून करून पळताना आरोपीचा झाला अपघात; शिताफीने पोलिसांनी केले त्याला अटक

बीड

अंकुश नगर भागातील खून प्रकरणातील आरोपी आपल्या दोन चाकी वाहनाने खून करून पळून जात होता. तोच मांजरसुबा घाटात त्याचा अपघात झाला. अपघातग्रस्त इसमास पाहून काही लोकांनी बीड येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले.

बीड येथील सरकारी दवाखान्यात त्याच्यावर उपचार चालू असतानाच तो व्यक्ती (आरोपी) कोणालाही न सांगतापळून गेला. कोणत्याही चित्रपटाला शोभेल अशीच घटना प्रत्यक्षात घडलेली आहे. मांजरसुंबा या ठिकाणी खून करून आरोपी पळून जात असताना त्याचा अपघात झाला आणि खबऱ्यांच्या मदतीने दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

आरोपी महादेव सर्जेराव शिंदे (रा शिंदे वस्ती जुना चरटा फाटा) हा खून करून मांजरसुंबा मार्गे पळून जात होता . पळून जात असताना त्याचा अपघात झाला व त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता तो दवाखान्यातून पळून गेला.

पिंपळनेर हद्दीतील एका धाब्यावर तो दारू पीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना गुप्तचरा कडुन माहिती मिळाली.  गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून त्यास ताब्यात घेतले. आरोपीने प्रकाश बळीराम गायकवाड याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. म्हणून आरोपी महादेव सर्जेराव शिंदे याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here