भिमा कारखान्याकडे  148 कोटी थकबाकी

दौंड  

दौंड मधील  पाट्स येथील  कर्जाच्या  खाईत पूर्णपणे बुडून गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेलया भिमा साखर कारखान्याकडे तबल 148 कोटी 87 लाख रुपयांची  पाटबंधारे खात्याची थकबाकी असल्याचे पुढे आले आहे.भिमा करखान्या सह यशवंत सहकारी साखर कारखाना  थेऊर, दौंड शुगर  दौंड  17 कोटी 9 लाख , छत्रपती सहकारी साखर कारखाना भ वानी नगर ,इंदापूर, आणि नीरा भिमा सहकारी साखर कारखाना इंदापूर यांचेकडेही  थकबाकी थकलेली आहे.या बाबत मिळालेली विश्वनिय माहिती अशी, पुणे जिल्ह्यात असलेल्या साखर  करखान्यांनी  जलसम्पदा च्या  खडकवासला आणि  नीरा प्रणाली या  विभागानची  सुमारे 434 कोटी  90 लाख रुपयांची बिगर सिंचन पाणी पट्टी थकवलेली आहे.

याबाबत समभंधित साखर कारखान्यांच्या व्यवस्थापणास  सातत्याने थकबाकी भरण्याबाबत सूचना देऊनही अद्यापही ही थकबाकी भरण्याची  खबरदारी साखर कारखान्यांनी घेतलेली नाही. जिल्ह्यात खडकवासला आणि नीरा कालव्याद्वारे सुमारे 15 हुन अधिक साखर कारखान्याच्या वापरासाठी ( बिगर सिंचन )  पाणी देण्यात येते.

मात्र  या कारखान्याची मागील वर्षांपासून पाणी पट्टीची रक्कम थकविली आहे, काही साखर कारखाने यांनी जलसम्पदा  विभागाकडून अनेक वेळा  पैसे भरण्या बाबत नोटीस पाठवल्या  नंतर केवळ पाणी बंद होऊ नये म्हणून  ऐकून  रक्कम यापैकी अंत्यत तोकडी जुजबी रक्कम भरून उर्वरित रक्कम भरण्याचे न  भरण्याचे धोरण अवलंबले आहे. मागील वर्षी (2020  अखेर ) जिल्ह्यातील 5 साखर कारखाने कडे  एकूण 434 कोटी 90 लाख रुपये थकबाकी थकलेली आहे. ही थकबाकी निव्वळ बिगर सिंचनाची आहे.याशिवाय शेतकऱ्यांची जलसम्पदा विभागाने कारखान्यांना कळलेले थकबाकी आणि ही थकबाकी  उसाच्या रकमेमधून वसूल करण्यासाठी दिलेल्या यादीमधील रक्कम तर अतिशय जास्त असल्याची आकडेवारी दिसून येते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here