शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार- ज्ञानेश्वर पटारे

श्रीरामपूर:

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शहर शाखा श्रीरामपूर यांचे वतीने प्रलंबित प्रश्नाचे निवेदन श्रीरामपूर नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांना देण्यात आले होते. प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिक्षण मंडळाचे प्रशासनधिकारी यांनी शिक्षक संघास बैठकीस लेखी पत्राद्वारे कळविले होते.त्यानुसार बैठक घेण्यात आली.

बैठकीत नगरपालिकेकडे १० टक्के हिस्सा थकीत रक्कम अंदाजे ८४ लाख रुपये असून जुलै २०२० पासून शिक्षकांचा १० टक्के पगार थकलेला आहे, तो मिळण्यासाठी सामुहीक प्रयत्न करण्याचे ठरले आहे. रजेचा पगार, मेडिकल बीले ,मार्च अखेर पर्यंत काढण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवडश्रेणी पात्र शिक्षकांचे प्रस्ताव तयार करण्यात येतील व ते मंजूर करून आणले जातील.

शिक्षकांचे पगार वेळेत होणेसाठी स्टेट बँकेतखाते उघडणेबाबत प्रशासनाधिकारी साहेब यांनी शिक्षक संघास विनंती केली. त्यानुसार शिक्षक संघाने विनंती मान्य करून शिक्षकांना बँकेत खाते उघडणेसाठी सांगीतले आहे . सर्व प्रश्न सोडविले जातील असे प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी आश्वासन दिले.

या विषयांवर झाली चर्चा :-

  • शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीची माहिती दरवर्षी दिली जाईल.
  • प्राप्तिकर विवरण पत्रे तपासून दिली जातील.
  • ऑनलाईन पगार करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल.
  • अनुदान वेळेत आल्यास पगार वेळेत केला जाईल.
  • नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेले शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात शासनाचे कोणतेही आदेश नाही त्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here