वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकारात्मक- वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख

2

मुंबई : वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध मागण्यांचा आढावा घेऊन या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यशासन सकारात्मक असून यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध संघटनांनी शेख यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या.

सहकारी सूतगिरण्यांनी सौरऊर्जेसाठी खासगी सहभाग घेण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. वीज दर व वीजबिलातील सवलतीसंदर्भात ऊर्जामंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. एकरकमी तडजोड योजनेसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही शेख यांनी यावेळी बोलताना दिली  तसेच कापूस खरेदीसाठी अनुदान तसेच अतिरिक्त जमिन विक्रीसंदर्भात सविस्तर अहवाल विभागाने सादर करण्याचे निर्देशही शेख यांनी दिले.
वस्त्रोद्योग राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, सहकारी सूतगिरण्यांना बिनव्याजी कर्जासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीत राज्यशासन व वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे प्रतिनिधींचा समावेश असावा.

या विषयांवर झाली चर्चा : 

सहकारी संस्थांना बिनव्याजी कर्ज देणे, प्रकल्प अहवालास मान्यता देणे, कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ, सूतगिरण्यांना कापूस गाठीसाठी १०  टक्के अनुदान देणे, सहकारी सूतगिरण्यांना वीजदरातील सूट तसेच वीज बिलात सवलत, अतिरिक्त जमीनीची विक्री करण्याची परवानगी देणे, यंत्रमाग सहकारी संस्थांना एकरकमी तडजोड (वन टाईम सेटलमेंट योजना) राबविणे, साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी धोरण तयार करणे, राष्ट्रीय सहकारी विकास निगम योजनेसाठी प्रस्ताव पाठविणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here