नायगाव येथे आ संजय जगताप यांच्या हस्ते गुळ उद्योगाचे उद्घाटन संपन्न…

0

जेजुरी : निलेश भुजबळ   
                 

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव (चौंडकरवाडी) येथे युवा उद्योजक संजय चौंडकर व गहिनीनाथ बोरकर यांनी श्रीनाथ ॲग्रो प्रोडक्टस् या नावाने गूळ उद्योग व श्रीनाथ (६० टन) वजन काटा हा व्यवसाय सुरू केला असून त्याचे उद्घाटन पुरंदर-हवेलीचे आ. संजय जगताप यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.            

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात ऊस उत्पादक वाढले असून साखर कारखाने यांना सगळा ऊस जात नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती हा गूळ उद्योग सुरू झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात प्रथमच गूळनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.            

यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, पुणे जिल्हा मद्यवर्ती बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य माणिकराव झेंडे पाटील, सरपंच हरिदास खेसे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
       

यावेळी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले की कमीतकमी भांडवलामध्ये उत्पन्न चांगले कसे मिळेल याचा अभ्यास करावा.

भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्योजगता शिबीर राबविणार आहे.तरुणांना जे उद्योग, व्यवसाय करायचे आहेत त्यासाठी लागणारी सर्व मदत आम्ही करणार आहोत.

तरुणांनी नोकरी पेक्षा उद्योग, व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करावे. या ठिकाणी गुळ उद्योग सुरू झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.         

 या वेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर, शिवसेना तालुका समन्वयक गणेश मुळीक, माजी उपसरपंच माऊली यादव, संत सोपनकाका संप्रदाय ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णाजी देवकर, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ शिंदे, पीडीसीसी  बँकेचे वसुली अधिकारी उत्तम शिंदे, रणजीत इंगळे, अंकुश भगत, भाऊसाहेब चौंडकर, मोहन चौंडकर, बाळासाहेब कड, आबा बोरकर, संतोष भगत, संजय भगत, सुभाष चौंडकर, गिरीधर चौंडकर, बारीकराव खेसे, वसंत खेसे, दिलीप मोरे, संपत कड, शांताराम कड, जयराम खेसे, संजय होले, दिपक चौंडकर, दत्तात्रय दरेकर, शिवाजी चौंडकर, नारायण चौंडकर, चंद्रकांत चौंडकर, अल्लाउद्दीन सय्यद, संतोष गायकवाड, महेश कड, सुनिल चौंडकर, मंगेश चौंडकर, बाळासाहेब शिंदे, संतोष वाघ, सुनिल पवार, संजय हजारे, विनोद झेंडे, दत्ता बोरकर, प्रविण राऊत, महेश पांढरे, विजय धर्माधिकारी, अतुल मुळे, तानाजी खटाटे, किरण मोरे, वैभव चौंडकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास खेसे यांनी केले. तर आभार सदाशिव चौंडकर यांनी मानले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here