सोशल मीडियाचा वापर करताय …. तर एकदा हे नक्की वाचा

3
सध्याचे युग हे सोशल मिडियाचे युग आहे. या सोशल मिडियाच्या युगात जो तो सोशल मिडिया साईटवर अपडेट राहून आपण किती सोशल आहोत हे जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम यासारख्या सोशल मिडिया साईटचा वापर करतो.
सोशल मिडिया भुरळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. आपण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहोत हे दाखवून देण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो म्हणूनच आपल्या आयुष्यातील चांगल्या – वाईट गोष्टी व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर,  इन्स्ट्राग्राम यासारख्या विविध सोशल मीडिया एपवर शेअर केल्या जातात. अगदी कौटुंबिक गोष्टी, कौटुंबिक फोटो, खाजगी माहिती सोशल मीडियावर शेअर करतात.
हल्ली तर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅलेंजचे पेव फुटले आहे.  कपल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज,  फ्रेंड चॅलेंज, सिस्टर चॅलेंज, डॉटर चॅलेंज असे रोज नवे चॅलेंज सोशल मीडियावर येत असतात. या चॅलेंजला भुलून अनेकजण आपले वैयक्तिक फोटो, माहिती सोशल मीडियावर शेअर करतात. या वैयक्तिक फोटोंचा आणि माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो हे माहिती असूनही ते सोशल मीडियावर शेअर करतात. लाईक, कमेंट, आणि शेअरच्या हव्यासापोटी हे सर्व केले जाते. सोशल मिडियाच्या कोणत्याही चॅलेंजला बळी पडून आपले फोटो शेअर करू नका त्याचा दुरुपयोग होऊ शकतो असे आव्हान पोलिसांकडून केले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.  काही तरुणी समोरच्या व्यक्तीला न भेटता फक्त फेसबुकवर चॅटिंग करुन त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात.
सोशल मीडिया हे  आभासी जग आहे तिथे कुणावर विश्वास ठेवू नये पण याच आभासी जगाला भुलून तरुणी फेसबुकवरील अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवतात आणि फसवणुकीला बळी पडतात. सोशल मीडियाच्या जगात पोस्ट लाईक्सची चढाओढ असते. या चढाओढीतुनच मग चुकीची माहिती शेअर होणे, गॉसिप होणे असे प्रकार होतात. आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; परंतु येथे व्यक्त होताना त्याच्या परिणामांचा विचार केला जात नाही त्यातून अफवा  पसरतात, गैरसमज होतात. सोशल मीडियाचा वापर विधायक कामांसाठी केला, तर नक्कीच चांगला आहे मात्र त्यातून अनेकदा विध्वंसक कृत्ये केली जातात त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जपून करायला हवा.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे 

3 COMMENTS

  1. Very nice post. I just stumbled upon your blog and wanted to say that I’ve really enjoyed surfing around your blog posts. In any case I’ll be subscribing to your feed and I hope you write again soon!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here