का मागितली निंबोरे कुटुंबीयांनी इच्छामरणाची परवानगी…..

पाइपलाइन टाकू द्या नाहीतर इच्छामरण्याची परवानगी द्यानिंबोरे कुटुंबाचे तहसीलदारांना निवेदन

श्रीगोंदा : प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्याला अनेक तहसीलदार लाभले मात्र आमचे काम करण्यास कोणताही अधिकारी तयार नाही त्यामुळे तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणच्या शेतकऱ्याने शेतात पाईपलाईन करण्यासाठी आतापर्यंत ८ वेळा अर्ज करूनही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आता आम्हाला कुटुंबासोबत इच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी निंभोरे कुटुंबीयांनी निवेदनातून तहसीलदार याना केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील रहिवाशी सागर शंकर निंभोरे यांनी आत्तापर्यंत ८ वेळा पाईपलाईन खोदकामासाठी अर्ज केला आहे मात्र महसूल प्रशासनाने याबाबत कोणतीही दक्षता न घेतल्यामुळे अद्यापही पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले नाही.

यासाठी निंभोरे कुटुंबीयांनी तहसील कार्यालयात ८ वेळा अर्ज केला आहे. त्यामध्ये प्रथम अर्ज त्यांनी दि.१३ नोव्हेंबर.२०१९ द्वितीय अर्ज ९ मार्च २०२० रोजी तर तिसरा अर्ज ६ मे २०२० रोजी चौथा अर्ज 29 मे २०२० रोजी तहसील कार्यालयाचा पाईप लाईन केस न. 1/२० चा आदेश तसेच त्यानंतर १५ जून २०२० रोजीचा अर्ज 1 जुलै २०२० चा अर्ज तसेच 2 नोव्हेंबर चा अर्ज व शेवटी २७ नोव्हेंबर चा अर्ज देऊनही शेतातील लीमोनीच्या पिकास आजपर्यंत पाणी मिळाले नाही. पाण्या अभावी फाळबाग व इतर पिके जळून जाण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे पोटच्या मुलासारखे जपलेल्या पिकांची आपल्या डोळ्या समोर राख रांगोळी होताना पाहवत नसल्यामुळे सागर शंकर निंभोरे , मालन सागार निंभोरे व श्रीमती रंजना शंकर निंभोरे यांनी आपल्या कुटुंबियासोबत इच्छा मरणाची परवानगी तालुक्याचे प्रशासकीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडे मागितली आहे.

त्यामुळे निंभोरे यांच्या अर्जावरती तहसीलदार नेमके कोणते पाउल उचलतात. कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री, सहकारमंत्री, सहकार आयुक्त, अहमदनगर जिल्हाधिकारी यांना टपाला द्वारे पाठविण्यात आल्याचे निंभोरे यांनी सांगितले आहे.

1 COMMENT

  1. The seller’s service is excellent. I was very dissatisfied with the hair I bought before. Picture one is the hair I sent before. It was very rough and had a lot of broken hair. There were also a lot of gray hair that was not dyed. I later returned it and contacted the seller again to send it back. The hair in picture 2 is much better. I don’t know what it will look like after washing it. Let’s add it later.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here