शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश…

ओतूर :

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम शांत होत नाहीत तोच आणे माळशेज पट्ट्यातील प्रत्येक निवडणुकीत निर्णायक मतदान होत असलेल्या महत्वपूर्ण अशा डिंगोरे जिल्हापरिषद गटात राजकीय चक्र वेगाने फिरून राष्ट्रवादी विचारांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे डिंगोरे जि. प.गटात राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

 

शिवसेनेचे उपनेते व शिरूर लोकसभेचे माजी खा.शिवाजीदादा आढळराव पाटील,माजी आमदार शरददादा सोनवणे यांचे प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम नीलम गार्डन मंगल कार्यालयात दि.१८ रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.

 

या प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडांगळे, बारामती लोकसभा मतदार संघाचे संघटक गणेश कवडे, जिल्हा समनव्यक संभाजी तांबे, माजी जि. प.सदस्यां लताताई आमले, डिंगोरेचे माजी सरपंच व माजी पं. स.सदस्य विश्वासराव आमले,निलेश आमले, रवींद्र लोहटे, दिलीप उकिरडे,राजेश आचार्य,अहिलूनाना लोहोटे, पांडुरंग मंडलिक आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here