चांगली आरोग्यसेवा दिल्याबद्दल डॉ योगिता दिंडे यांचा कोरोना युध्दा पुरस्कार

ढोरजळगांव:

शेवगांव तालुक्यातील दिंडेवाडी गावचे भुषण व कोरोना संसर्गाच्या काळात शेवगांव तालुक्यातील व ग्रामीण भागातील जनतेला साईदीप हॉस्पिटल येथे अपुलकीने वेळोवेळी विचारपुस करून चांगली आरोग्यसेवा दिल्याबद्दल डॉ योगिता दिंडे यांचा कोरोना युध्दा पुरस्कार देऊन आव्हाणे बु ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रवादी कॉग्रेसचे दक्षिण जिल्हा कार्यध्यक्ष संजय कोळगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. योगिता दिंडे म्हणाल्या कोरोना विषाणुचा प्रादुभाव पुन्हा वाढु लागला आसुन प्रत्येकाने आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टनसिंग अवलंब करून योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच धार्मिक व लग्नसमारंभाच्या कार्यात जास्त गर्दी न करता योग्य ती दक्षता घ्यावी , कोरोना काळात आपल्या परीसरातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली त्यात आपलेपणाचा निश्चितच आनंद मिळाला भविष्यातही कार्यतत्पर राहुन मदतीची ग्वाही डॉ दिंडे यांनी बोलताना दिली.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here