आम आदमी पार्टी कडून नगरपालिकेचा दशक्रिया विधी

0

आम आदमी कडून मृतप्राय बीड नगरपालिकेचा दशक्रिया विधी:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड :

बीड शहरातील असुविधा, अस्वच्छता, पिण्याचे पाणी, गटार, नाल्या आदि संदर्भात वारंवार निवेदन, आंदोलनानंतर सुधारणा न झालेल्या नगरपालिकेला निदान आपण दर रविवारी स्वच्छता अभियान राबवल्यानंतर नैतिकतेच्या आधारे समस्या सोडवल्या जातील. या आशेवर गेली 10 आठवडे शहरातील विविध भागात स्वच्छता अभियान राबवणा-या आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, सचिव रामधन जमाले, संघटक प्रा. ज्ञानेश्वर राऊत, शहरप्रमुख सादेक शेख व सहका-यांनी आज अखेर तेलगाव नाका येथील विविध समस्या संदर्भात मृतप्राय नगरपालिकेचे विधिवत दशक्रिया विधी करण्यात आला.

यावेळी डाॅ.गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड आंदोलनात सहभागी झाले होते.

आम्ही भारतात आहोत की पाकिस्तानात?

तेलगाव नाका परिसरातील हुसैनीया काॅलनीत नाल्या नव्हत्या, घंटागाडी येत होती परंतु कचरा घेऊन जात नव्हती, कचरा टाकायचा म्हटले तर 10 रूपये मागायचे?? तुमचे मतदान याठीकाणी नाही म्हणुन मुलभूत सुविधा नाकारणा-या लोकप्रतिनिधींना नागरीकांनी आम्ही भारतातीलच आहोत की पाकिस्तानी??असा प्रश्न विचारत भेदभाव केल्याचे निदर्शनास आणून दिले.

नगरपालिकेच्या अनास्था संवेदनाहीनतेमुळे प्रतिकात्मक दशक्रिया विधी करावा लागला

वर्षभर निवेदन देऊन कंटाळून शेवटी आम्ही 10 आठवड्यापुर्वी शहर स्वच्छता अभियान हाती घेतले, स्थानिकांकडून सहकार्य मिळाले, आज 10 वा आठवडा असुन नगराध्यक्ष अथवा मुख्याधिकारी नगरपालिका यांनी अद्याप दखल न घेतल्याने आज दहावा आठवडा दिवशी प्रतिकात्मक दशक्रिया विधी आंदोलन करण्यात आले आहे, दखल न घेतल्यास भविष्यात तेरावा वर्षश्राद्ध, आदि विविध उपक्रमाद्वारे आमचा संघर्ष सुरूच राहील. माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आप

शहरातील नागरिक मुर्दाड मनाचे, 40 वर्षापासून निष्क्रिय नगराध्यक्ष तर विरोधीपक्ष आस्तित्वातच नाही,5 वर्ष कार्यकर्ते विरोधात नेते मात्र निवडणुकीत संधान बांधतात :-

गेल्या 40-45 वर्षापासून स्व. केशरकाकु क्षीरसागर यांच्या पासून खासदारकी, आमदारकी ,मंत्रीपद आणि नगराध्यक्ष कायम घरात असलेल्या एका घराण्याने निर्विवाद सत्ता उपभोगली परंतु त्यांना अद्याप मुलभुत सुविधासुद्धा देता आल्या नाहीत, विरोधीपक्ष नावाला आस्तित्वातच नाही 5 वर्ष कार्यकर्ते जरी विरोधात आरडाओरड करत असले तरी ऐन निवडणुकीत नेतेमंडळी आर्थिक लाभ मिळताच मॅनेज होतात या गोष्टीमुळे पर्याय नसलेल्या बीडकरांच्या मुर्दाड मनाला या गोष्टीची सवयच झालीय अशी शंका येते,

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here