निपचित अवस्थेत एक दिवसाचे बाळ सापडले….

0

समनापूर शिवारात जिवंत अर्भक आढळले

घारगाव :

संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारातील जेडगुले वस्ती येथे एक दिवसाचं पुरुष जातीचं जिवंत अर्भक सोमवारी (१ मार्च) सकाळी दहा वाजेच्या सुमारास आढळून आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, समनापूर शिवारातील जेडगुले वस्ती जवळील काटवनात एक दिवसाचं अर्भक निपचित पडलेल्या अवस्थेत परिसरातील नागरिकांना दिसले.

त्यांनी तत्काळ पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांना माहिती दिली. त्यांनी ही माहिती शहर पोलिसांना कळविली. माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे सुभाष बोडखे, राजेंद्र डोगरे, महिला पोलीस वनिता चोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अर्भक ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात महिलेच्या विरोधात गुरनं.113/2021 भादंवि कलम 317 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार अमित महाजन हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here