व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण संदर्भात योग्य माहिती दिल्यास मिळणार बक्षीस …

बेलापुर :

गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरणा संदर्भात अचुक माहीती देणारास बेलापुरातील व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर करण्यात आले असुन घटनेच्या निषेधार्थ शनिवार दिनांक ६ मार्च रोजी गाव बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे.

 

बेलापुरातील व्यापारी गौतम हिरण हे तीन दिवसापासून बेपत्ता आहेत पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. असला तरी गुन्हा घडून बराच कालावधी लोटल्यामुळे गौतम हिरण यांच्या विषयी व्यापारी व ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील आंदोलनांची दिशा ठरविण्यासाठी बेलापुर ग्रामस्थांची बैठक ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्वानुमते असे ठरविण्यात आले की या घटनेबाबत अचुक माहिती देणारास योग्य ते बक्षिस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

या वेळी हिरण परिवार व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीने अचुक माहीती देणारास एक लाख रुपयाचे बक्षिस देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच शनिवार दिनांक ६ मार्च रोजी या घटनेच्या निषेधार्थ गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सोमवार पर्यंत गौतम हिरण यांचा शोध लागला नाही. तर बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्यणही एकमताने घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here