…तर विद्यार्थ्यांना खगोल शास्त्राचा अभ्यास करणे सोपे जाईल ; फिरत्या तारांगणाचा स्वागतार्ह निर्णय..

कर्जत :
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पेनेतून कर्जत जामखेड या तालुक्यातील विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन या विषयात रुची निर्माण व्हावी यादृष्टीने  सफर  अंतराळाची तसेच शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल इंटर इंटरॅक्टिव्ह क्लासरूम या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला.
त्यानुसार आता कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे फिरते तारांगण प्रत्येक शाळेत प्रदर्शित होणार आहे. या फिरत्या तारांगणामध्ये विद्यार्थ्यांना नेहरू तारांगण प्रमाणे अवकाशाबद्दल रंजक माहिती मिळेल तसेच टेलिस्कोपद्वारे प्रत्यक्ष ग्रह, तारे बघायला मिळतील.  प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना  आपली आकाशगंगा, ग्रह, उपग्रह, तारे, आकाश याबद्दल कुतूहल असते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यासर्वांचे निराकरण पाठ्यपुस्तकाद्वारे होऊ शकत नाही.
तसेच अनेक शाळेत सुसज्ज प्रयोगशाळा नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात याविषयी गुढ कायम राहते. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील  जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच इतर मुलांना आपल्या घरीच किंवा शाळेत बसून आकाशगंगा पहावयास मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सकदृष्टी व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जाईल. जर असे फिरते तारांगण प्रत्येक शाळेत प्रदर्शित झाले तर विद्यार्थ्यांना खगोल शास्त्राचा अभ्यास करणे सोपे जाईल यातूनच भविष्यातील शास्त्रज्ञ निर्माण होतील.
आमदार रोहित पवार यांनी फिरते तारांगण उभारण्याचा निर्णय घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे याबाबत आमदार रोहित पवार यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. फिरते तारांगण हा प्रकल्प अतिशय स्तुत्य आणि अनुकरणीय असल्याने अन्य आमदारांनीही हा प्रकल्प आपापल्या मतदार संघात राबवावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here